राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची अजिंठा येथे सांत्वन भेट
सिल्लोड : अजिंठा येथे दोन दिवसांपूर्वी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या उमेरखान नासिरखांन पठान वय १६ वर्ष, शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज वय १६ वर्ष, अक्रमखान आयुबखान पठान वय १६ वर्ष सर्व रा. अजिंठा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शनिवार ( दि.2 ) रोजी अजिंठा येथील तिन्ही शोकाकुल परिवाराच्या घरी सांत्वनपर भेट देऊन घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. मयतांच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, अशोक सूर्यवंशी, पपिंद्रपाल वायटी, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे यांच्यासह अजिंठा गावचे सरपंच नजीर गाईड, सय्यद नासेर, अब्दुल अजीज, सय्यद एजाज यांच्यासह शोकाकुल परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.