श्री राम कथा, रामनवमी महोत्सव कार्यक्रमात प्रिती बंड यांच्या हस्ते महाआरती
अमरावती : बडनेरा मार्गावरील देवरनकर नगर येथे गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था मंडळा च्या वतीने परम पूज्य वैभवी श्री जी यांच्या सुमधुर वाणीतुन श्री राम नवमी महात्म्य सप्ताह व रामकथा कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले असुन अयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मंदीराची हूबेहूब भव्य प्रतीक्रुती उभारण्यात आली आहे. तसेच कार्यक्रम स्थळी मोठ्या स्वरूपात आकर्षक रोषणाई आणि सर्व देव देविताच्या मुर्तीचे सुंदर देखावां निर्मिती केली आहे. या कार्यक्रमाला मुख्य यजमान, अतिथी, प्रमुख पाहुणे अमरावती जिल्हा शिवसेना संघटीका प्रतीताई बंड यांनी उपस्थिती दर्शविली तसेच आयोजकांच्या वतीने प्रितीताई बंड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी संपुर्ण परीसर रोषणाई ने व धार्मिक आध्यात्मिक उत्साहाने भक्तीमय वातावरणात सर्व श्रौतेवर्गानी कार्यक्रमाचा आनंद लूटला. दरम्यान परमपूज्य वैभवी यांच्या हस्ते शिवसेना जिल्हा संघटीका प्रितीताई बंड यांचा शाल, श्रीफळ, व भगवत गीता देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रिती ताई बंड, नवभारत, व्रुतपत्राचे संपादक त्रिदीप वानखडे, दिनेश कुमार देशमुख बुलढाणा, मंडळाचे अध्यक्ष शुभम शेगोकार, युवासेना अमरावती जिल्हा समन्वयक राहुल माटोडे भाजपा युवा मोर्चाचे बादल कुलकर्णी, डॉ. कलंत्री, सतीष धानोरकर, शुभम वानखेडे, महेश खोडे, व इतर सर्व मंडळाचे कार्यकर्ते ,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.