नाशिकच्या महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक भांडाराच्या कार्यालयात व्यवस्थापकाची रोज दारू पार्टी
नाशिक (मनोज साठे) नाशिक शहरात महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक भांडाराच्या कार्यालयात चक्क अधिकारी दारू पितांना अढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करून या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
भांडार व्यवस्थापक या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून रोज दारू पित असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर त्याचे कृत्य चव्हाट्यावर आणण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले. महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक भांडारचे व्यवस्थापक असे दारू च्या नशेत तर्र आढळून आल्यानंतर शिवसैनिकांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी डामसे यांच्यावर तिथेच प्रश्नांची फैरी झाडल्या. मात्र, त्या प्रश्नांना उत्तर देण्याची शुद्धही त्यांच्यात नव्हती यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी शिवसैनिकान समोर आपली कैफियत मांडली. दरम्यान सर्व घटनेचा व्हिडिओ तयार केला असून डामसे यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक भांडारचा भोंगळ कारभार समोर आला आहे.