महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फज्जा
बोदवड (सतीष बावस्कर) बोदवड तालुक्यातील पंचायत समिती कार्यक्षेत्रात वरखेड खु, येथे गावात सार्वजनिक विहीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत होत असता विहिरीचे खोदकाम मात्र चक्क मशीन द्वारे करण्यात येत असल्याचे भांडाफोड करण्यात आले. ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केली.
या योजनेअंतर्गत मागेल त्याला काम आणि कामाचे दाम अशी घोषणाही करण्यात आली. पण तसे बोदवड तालुक्यातील वरखेड खु, सार्वजनिक विहिरीचे काम गट नंबर 6 मध्ये मजुरांना डावलून सरळ संबंधित रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराने त्यांना हवे असलेले रोजगार दाखवून शासनाची फसवणूक करण्याचा उद्योग सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ललित श्रीराम पाटील (बोदवड) यांनी स्पीड न्यूज महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सदरची बातमी प्रसिद्ध करून दिलेल्या तक्रारीवर निराकरण व्हावे, याबाबत संबंधित असलेल्या अधिकारी यांनी सदर बाबतीत उचित निर्णय घेऊन तात्काळ अर्ज निकाली काढावा महाराष्ट्र शासन यांच्यापर्यंत संदेश पोसण्याचे काम केले आहे.