अक्कलकुवा येथे युवासेनेचे केंद्र सरकारच्या निषेधार्थ मिठाई वाटून उपहासात्मक आंदोलन
कोठार (राहुल शिवदे) अक्कलकुवा येथील दाजीबा पेट्रोल पंपजवळ शिवसेना व युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ़ीच्या निषेधार्थ मिठाई वाटून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये दि.3/4/2022 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी केंद्र सरकारच्या पेट्रोल, डीज़ल, गेस सिलेंडर व ईतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी आणि महागाई विरोधात थाळी वाजवून व मिठाई वाटप करुन केंद्रातील भाजपा सरकार विरोधात आभार मानण्याचे उपहासात्मक आंदोलनाचे आयोजन करण्याच्या सुचना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज अक्कलकुवा येथे शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली दाजीबा पेट्रोल पंपवर उपहासात्मक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. व विविध घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी उपस्थितांना सदर आंदोलनाची सविस्तर माहिती देत. सर्वसामान्य जनतेला महगाई च्या आगीत झोकून मारणार्या केंद्र सरकारच्या धोरणाचे निषेध नोंदवण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य किरसिंग दादा वसावे, जिल्हा संघटक लक्ष्मण भाऊ वाडिले ,शिवसेना तालुका प्रमुख जयप्रकाशभैया परदेशी, उपतालुका प्रमुख तुकाराम वळवी, ग्रा. पं. सदस्य जगदीश चित्रकथी, छोटू भैया हाश्मी, पृथ्वीसिंग दादा पाडवी, सिंधुताई वसावे, सरला वळवी, पंजराळे ताई, रविंद्र चौधरी, जसराज पवार, प्रकाश खींची, आश्विन सोनार, पार्थ लोहार, जमील बलोच हाफिज मकरानी शिवसैनिक गोलू चंदेल शिवसेना व युवासेना व युवतीसेना, विद्यार्थी सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना सर्व शिवसेना अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलन यशस्वीतेसाठी तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, युवा सेना जिल्हा प्रमुख ललित जाट, जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शहर प्रमुख रवि चंदेल शहर उपप्रमुख जीतु लोहार आदीनी परिश्रम घेतले..