सप्तशृंगी देवी कावड यात्रींना खेड दिगर येथे अन्नदान
शहादा : श्री सप्तशृंगी देवी पदयात्रा सेवा मंडळ, असलोद येथील कावडयात्री भाविकांना खेडदिगर येथे भोजन पाण्याची व्यवस्था करण्यात आली. श्री सप्तशृंगी देवी पदयात्रा सेवा मंडळ, गाव असलोद ता. शहादा, येथिल कावड यात्रेला दि.23 मार्च रोजी, ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) येथून सुरुवात करण्यात आली.
ह्या कावड पदयात्रेला सन 2010 सुरुवात झाली व ती दरवर्षी काढली जाते. यावर्षीही कावडपदयात्रा, सनावद, अहिर खेडा, खरगोन, दसनावल, शेंधवा, राणीमोहिदा, आमझीरी मार्गाने मध्यप्रदेशातील गावातून महाराष्ट्र सीमेवरील खेडदिगर व शेवटी असलोद येथिल सप्तशृंगी देवी मंदिर पावेतो काढण्यात आली होती. कावड यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गावात पूर्व नियोजनानुसार अन्नदात्यांकडून भाविकांसाठी जेवणाची व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली . त्याच अनुषशंगाने खेड दिगर येथील, मोरे हॉस्पिटल चे डॉ.मुकेश मोरे यांच्याकडून भाविकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तेथील पुजारी ज्ञानेश्वर पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मातेच्या आरतीचा मान डॉ. मोरे यांना देण्यात आला.
श्री सप्तशृंगी देवी पदयात्रा सेवा मंडळ,असलोद या मंडळाकडून कावडयात्रेचा उपक्रम हा सतत तेरा वर्षापासून राबविला जात आहे. कावड यात्रेचे नियोजन हे कार्यकारणी सदस्य धर्माआबा, कैलास पाटील, दिवानसिंग चव्हाण, उद्धव गोविंद पाटील, तारासिंग भाऊ पावरा, चंद्रसिंग सोलंकी, यांनी केले या वेळी हरिहर माळी, विनोद पाटील यांनी केले.