आ. कुणाल पाटील यांच्या निधीतील सहा रुग्णवाहिकांचे एकाचवेळी लोकार्पण रुग्णवाहिका ठरणार जीवनदायीनी
धुळे (करण ठाकरे) कोरोनाच्या लाटेत अनेक उणीवा भासल्या परीणामी मनुष्यहानीचा फटका बसला. या पुढील काळात आरोग्ययंत्रणा बळकट करुन अतिदक्षतेच्यावेळेस रुग्णवाहिका जीवनदायी ठराव्यात म्हणून तालुक्यात ६ रुग्णवाहिका घेण्याचा, निर्णय घेतला. या पुढील काळात आपल्याला सर्वांना मिळून ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ठ आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यासाठी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले.
आ. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून धुळे तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. सदर रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज धुळ्यात आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निधीतून एकाचवेळी सहा रुग्णावाहिका देणारे आ. कुणाल पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरले आहे, त्यांच्याया महत्वपूर्ण निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रात स्वागत होत आहे. धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या स्थानिक विकास निधी २०२० २१ अंतर्गत १ कोटी ६ लक्ष रुपये निधीतून लामकानी, नगाव, ने, आनंदखेडेशिरुडकापडगे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीचे मुहूर्त साधुन आज दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. धुळे पंचायत समिती आवारात आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, विकास कामे ही निरंतर चालणारी प्रक्रीया आहे, मात्र विकासाबरोबरच जनतेच्या माध्यमातून असंख्य रुग्णांचीवैद्यकिय सेवा करता आली याचा मला सर्वात मोठा आनंद आहे. यापुढेही रुग्णसेवेचे घेतलेले व्रत कायम सुरु राहिल अशी ग्वाही आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले कि, धुळे तालुक्याच्या सर्वांगिण विकासाबरोबरच तालुक्यातील जनतेची सेवा घडावी आणि रुग्णांना तत्काळ वैद्यकिय उपचारासाठी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून स्थानिक विकास निधीतून धुळे तालुक्यात रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात रुग्णवाहिकांअभावी रुग्णांचे प्रचंड हाल झाले. किंबहूना काहींना जीवही गमवावा लागला. त्यामुळे पुढील काळात अशी गैरसोय होवू नये म्हणून या रुग्णवाहिका जीवनदायी ठरणार आहेत. धुळे तालुक्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतील. येणार्या काळात ग्रामीण जनतेला उत्कृष्ट आणि तत्काळ आरोग्य सेवा देता यावी म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. असे हीआ. कुणाल पाटील यांनी शेवटी सांगितले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला आ. कुणाल पाटील यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, गटविकास अधिकारी आर. डी. वाघ, तालुका आरोग्य अधिकारी तरन्नुम पटेल, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, माजी सभापती बाजीराव पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, माजी पं.स. सदस्य पंढरीनाथ पाटील, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुडके, अशोक 5. विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, लामकानी उपसरपंच धनराज महाले, कापडणे उपसरपंच सौ. अंकिता पाटील, नेर सरपंच गायत्री जयस्वाल, जि. प. सदस्य पाटील, जि.प. सदस्य आनंद अरुण पाटील, माजी पं.स. सदस्य योगेश पाटील, फागणे सरपंच कैलास पाटील, माजी पं.स. सदस्य छोटू चौधरी, गोकुळसिंग राजपूत, पं.स. सदस्या सुरेखा बडगुजर, दिपक कोतेकर, माजी सरपंच शिवाजी अहिरे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष हर्षल साळुंके, बापू खैरनार, पं.स. सदस्य भाऊसाहेब पाटील, राजीव शर्मा, राजेंद्र पाटील, डॉ. अनिल भामरे, किरण नगराळे, अंजन पाटील, प्रल्हाद मराठे, सागर पाटील, तुषार गर्दे, हरिष 1 पाटील, जितेंद्र पवार, सरपंच पांडूरंग मोरे, संदिप पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील एकमेव आमदार मतदार संघाच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामे केली जातात मात्र त्याबरोबरच रुग्णांना तत्काळ वैद्यकिय उपचार मिळावेत म्हणून आपल्या स्थानिक विकास निधीतून एकाचवेळी मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तब्बल ६ रुग्णवाहिका देणारे आमदार कुणाल पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरले आहेत. मतदारसंघातील कामातून पाणीदार ठरलेले आमदार आता रुग्णांसाठी देवदूत ठरले.