घोडदे येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर तसेच स्वच्छता अभियान संपन्न
साक्री (प्रतिनिधी) तालुक्यातील घोडदे येथे शिवजयंतीच्या निमित्ताने घोडदे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आगळी-वेगळी म्हणजेच सांस्कृतिक व आधुनिक पध्दतीने साजरी करणार आली. सांस्कृतिक पध्दतीने म्हणजेच गावातील मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविले. तसेच आजच्या काळाची गरज ओळखून आधुनिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यासाठी “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या सामाजिक हेतूने विठ्ठल-रुक्मिणी समाज मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाप्रसंगी साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरआप्पा वाघ, तालुकाप्रमुख पंकजदादा मराठे, साक्री पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, अजित बागुल, शिवसेना तालुका संघटक, युवासेना धुळे जिल्हा समन्वयक तथा मातोश्री ग्रुप अध्यक्ष अमोल सोनवणे, उपतालुकाप्रमुख कैलास ठाकरे, रमेश शेवाळे, विभागप्रमुख मंगलदास सूर्यवंशी, दहिवेल शहरप्रमुख उदयभाऊ माळी, युवासेनेचे आनंद महाजन, राकेश चौधरी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपतालुकाप्रमुख अमोल क्षीरसागर, बहिरमदेव उत्सव समिती तसेच सर्व मित्र घोडदे यांनी केले.