महाराष्ट्र
बोदवड तहसीलदार योगेश टोपेकडून सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या स्पॉट पंचनामा
बोदवड (सतीश बाविस्कर) शहरात सहाय्यक निबंधक कार्यालय असून या ठिकाणी शासनाच्या परिपत्रकानुसार शिवजयंती साजरी केली नसल्याचे दिनांक १९/०२/२०२२ वार शनिवार रोजी शिवजयंती साजरी न केल्याने वेळ १७:०० सुरू करून प्रत्यक्ष कार्यालयात पाहणी केली असता शिवजयंती साजरी केली नसल्याचे आढळून आले वेळ १७:१० वाजता पूर्ण केले असे पंचनाम्यात म्हटले आहे.
स्पोर्ट पंच यांच्यासमोर कार्यालय पाहणी केली असता असता कोणत्याही प्रकारची जयंती साजरी केल्याचे दिसून आले नाही. जयंती साजरी न केल्यामुळे काही शिवप्रेमींनी व या कार्यालयाच्या बद्दल संतप्त भावना आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवले. पंचनामा ठिकाणी पच १) राजू ओंकार पाटील, २) अशोक जगन्नाथ हिवराळे, ३) नरेंद्र गुलाबराव कदम, ४) केदार दिलीप उगले व तलाठी मंगेश वासुदेव पारिसे हे होते.