चैत्र शुद्ध एकादशी दिनांक १२ लाच ; वारकरी संप्रदाय पाईक संघ
सोलापूर : वारकरी संप्रदायात श्रीक्षेत्र पंढरपूरच्या चार महत्त्वाच्या यात्रा /वारी मानलेल्या आहेत.त्यापैकीच हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुद्ध एकादशी हि यापैकीच महत्त्वाची वारी आहे. यावर्षी अनेक दिनदर्शिका मध्ये दिनांक १२ व १३ एप्रिल अशा दोन दिवशी काही गावांची विभागणी करत दिलेल्या आहेत. मात्र वारकरी संप्रदायात मान्यता असलेल्या दाते पंचांगानुसार चैत्र शुद्ध एकादशी हि दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजीचीच दिलेली आहे.
यासंदर्भात तपशील असा कि दिनांक १३ रोजी सकाळी ५ वाजून ३ मिनिटांनी एकादशी तिथी संपत आहे.तर दिनांक १३ चा सूर्योदय हा ०६:२४ चा आहे त्यामुळे त्या दिवशी शुद्ध द्वादशी आहे एकादशी नाही.
तरी वारकरी बांधवांनी कोणत्या हि संभ्रमात न राहता मंगळवार दिनांक १२ एप्रिल रोजी चीच एकादशी ग्राह्य धरुन आपली वारी व उपासना पार पाडावी असे जाहीर आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे वतीने ह.भ.प.सागर महाराज बेलापूरकर, देवव्रत राणा महाराज वासकर, विठ्ठल महाराज चवरे, चैतन्य महाराज देहूकर यांनी केले आहे.