मालपुर येथील अमरधाममध्ये घाणीचे साम्राज्य ; उपसरपंच संतोष चव्हाण यांच्याकडून साफसफाई
मालपुर (गोपाल कोळी) शिंदखेडा तालुक्यातील मालपुर हे परिसरातील मोठ्या लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात मोठी ग्रामपंचायत असुन विकास कामात अग्रेसर असली तरी काही अंशी कामात दुर्लक्ष केले जात असते. माणुस जन्माला भुतलावर येतो. त्याचे जीवन हे शेवटी मरणाच्या सटीला पुजलेले असते. म्हणुन प्रत्येक गावाला अमरधामची व्यवस्था केली आहे.
ज्या अमरधाम मध्ये मानवाचा देह अर्पण करण्यात येतो. तीच जागा घाणीच्या साम्राज्याने ग्रासली असेल तर बाहेरून येणाऱ्या नातलग आणि आपेष्ट मित्र मंडळी काय नाव घेऊन जाणार अशीच परिस्थिती मालपुर गावातील अमरधामची आहे. हे चित्र पाहिल्यावर स्वत उपसरपंच असलेले संतोष भावराव चव्हाण यांनी दोन तीन मजुर लावून अमरधामची आजुबाजुला असलेल्या घाण साफसफाई करुन घेतली. असा उपक्रम हाती घेवुन चांगले काम करून मानवता धर्म पाळला म्हणून त्यांचे सर्वत्र आभार मानले जात आहेत.