शिंदखेडा येथील पिक संरक्षण सहकारी सोसायटीच्या सभेत संजय बडगुजर व सुरेश महाले यांची स्विकृत संचालकपदी बिनविरोध निवड
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील वरपाडे रोडवरील शिंदखेडा पिक संरक्षण सहकारी सोसायटीची सभा चेअरमन विजय (नाना)पोपट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच नवीन संजय गुलाबराव बडगुजर यांची तज्ञ संचालक व सुरेश बाबुलाल महाले यांची स्विकृत संचालकपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी दोन्ही संचालकांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन विजय नाना चौधरी, व्हाय चेअरमन योगेश माधवराव देसले, संचालक अरुण चैत्राम देसले, दिलीप आधार पाटील, बन्सीलाल पितांबर बोरसे, कैलास निंबा पाटील, दत्तात्रय जगन्नाथ देसले, अशोक राजाराम परदेशी, गजानन विश्वास भामरे, यादव प्रेमराज मराठे, विलास अर्जुन मोरे, संचालिका मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे, सचिव मनोहर रामराव भामरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश नागो देसले, रावसाहेब सुभाष देसले उपस्थित होते. सभेचे प्रास्तविक व सुत्रसंचलन अशोक गिरणार यांनी केले.