मुक्ताईनगर शहरामध्ये आर्मी जवान सुनील झाल्टे यांचा सत्कार
मुक्ताईनगर (सचिन झनके) सुनील अजबराव झाल्टे देशाच्या भारतीय सेना मध्ये 22 वर्ष नायक पदावरती काम केले. सेवा पूर्ण करून मोठ्या गौरवाने मायदेशी परतले. सेवा पूर्ण करून झाल्यानंतर गावात प्रथम आठवण करतात त्यांचे दोन चार दोन हजार बावीस रोजी स्वयंपुर्ती गौरव सत्कार समारंभ आयोजित केला.
नगर मधील व्यापारी संघातील लोकांनी आर्मी जवान यांचे स्वागत केले व देशाच्या बावीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील येथील कार्यक्रमाला उपस्थिती देऊन कार्यक्रमाचे देश सैनिकाची आदर भावना जोपासली. सर्वसामान्य नागरिकांनी मानवंदना देऊन या देशाच्या संरक्षण करणाऱ्या सैनिकाला वंदन केले. मुक्ताईनगर परिसरामध्ये सर्वत्र यांची रॅली काढून त्यांना मोठा मान सन्मान आदर देण्यात आला. याप्रसंगी सर्वत्र देश भावनाची प्रेम सर्वांच्या डोळ्यात मनात हृदयात दिसून आले.