महाराष्ट्रराजकीय
निश्चित दौऱ्याचा दुसरा टप्पा पूर्ण ; गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वरुण सरदेसाई यांनी साधला संवाद
अमरावती (महेंद्रसिंग पवार) निश्चय दौरा दुसरा टप्पा आज पूर्ण झाला. यावेळी विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचे प्रमुख मार्गदर्शन सर्व पदाधिकारी यांना लाभले.
दौर्या दरम्यान केलेले निश्चय नक्कीच युवा सैनिक पूर्ण करतील. सदर अमरावती दौरा यशस्वी करण्यासाठी आपले अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राज दीक्षित यांना वरुण सरदेसाई यांच्याकडून शाबासकीची थाप भविष्यात अमरावती जिल्हा कडून नेहमी राज दीक्षित यांच्या नेतृत्वात असे कार्यक्रमन भूतो न भविष्यती असे कार्यक्रम घेण्याची दीक्षित यांनी सर्व युवासेना पदाधिकारीतर्फे ग्वाही दिली.