युवासेना शिंदखेडा विधानसभा मतदार संघाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात थाळी बजाव- ताली बजाव आंदोलन
शिंदखेडा (यादवराव सावंत) दोंडाईचा येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व सचिव वरुण सरदेसाई सहसचिव पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली थाळी वाजवत व खडीसाखर वाटप करत अनोखा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी वाचा आणि थंड बसा,ना निती-ना मेल बस मेहंगा पेट्रोल डिझेल, पेट्रोल डिझेल १००/ पार हेच का अच्छे दिन मोदी सरकार, बहोत हो गयी मेंहगाई की मार- होश मै आवो मोदी सरकार, देश सांभाले संता बंता बेहाल होगई सारी जनता,ना निती ना मेल बस मेहेंगा पेट्रोल डिझेल, असे घोषणा-बॅनर उपस्थित करत तसेच पदाधिकारी यांनी हातात धरत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन आक्रमक केले आहे.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा समन्वयक डॉ.भरत राजपुत, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, तालुका प्रमुख ईश्वर पाटील, छोटु पाटील,उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, राका शेठ, विजय भोई, आबा चित्ते, राज ढोले, राकेश पाटील, राजु देशमुख, युवसेनेच्या उपतालुका युवाधिकारी, सुमित देशमुख, प्रदीप पवार, बापु राणा, उपशहर युवाधिकारी, भुषण चौधरी, गणेश विसावे, लखन मराठे, महेंद्र धनगर निखिल जयसिंगाणी, देवेंद्र अहिरे, विक्रम अहिरे, कैलास मालाचे, जयेश बडबुजर, उमेश बागल, विक्की पाटील, भुषण कोळी, निलेश लोणारी, गोलु पाटील, मनोज पाटील व शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.