अखेर जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलाव पुर्ण क्षमतेने सुरु
धुळे : कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलाव पुर्ववत सुरु करण्या संदर्भातील जलतरण तलावाचे लाभार्थी, हरिओम ग्रुपचे पर्वर्तक, महेशबाबा घुगे, योगशिक्षक डॉ. जगदिश गिंदोडिया, आदिंच्या मागणीची दखल घेत, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सबंधित जलतरण तलाव सुरु करण्या सबंधीच्या सुचना जिल्हा क्रिडा अधिकारी आसाराम जाधव आणि जल तरण तलावाचे संचालक सागर आघाव यांना दिल्या होत्या.
जिल्हाधिकारी शर्माच्या सुचनेनुसार कार्यप्रणाली पूर्ण झाल्याची प्रत्यक्ष जलतरण तलावाला भेट देऊन खातरजमा केली व जलतरण तलाव कार्यरत करण्यासाठी आदेश पारीत केल. त्याप्रमाणे तलाव कार्यान्वीतही झाला. पण मध्येच, माशी शिंकली. जिल्हा क्रिडा संकुलाला व जल तरण तलावाला पाणी पूरवठा करणारी पाईप लाईन जिर्ण झाल्याने फूटली व पुन्हा विघ्न आले. पण, जिल्हाधिकारी शर्मा, जिल्हा क्रिडा अधिकारी आसाराम जाधव, आणि संचालक सागर जाधव यांच्या तत्परतेमुळे युद्ध पातळीवरुन नविन पाईप लाईन टाकून पुन्हा पुर्ण क्षमतेने सदर जलतरण तलाव कार्यान्वित करण्यात आला. त्याबद्दल महेशबाबा घुगे, डॉ. जगदिश गिंदोडिया यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव व संचालक सागर जाधव यांचे लाभार्थीच्या वतीने आभार मानलेत. बुधवार दि. 6 एप्रिल सकाळी 6 पासून सदर तलाव कार्यान्वित होत असल्याने लाभार्थीनी लाभ घेण्याचे आवाहन क्रिडाधिकारी आसाराम जाधव व संचालक सागर आघाव यांनी केले आहे.