भर स्टेजवर आमदाराने कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली ; व्हिडीओ व्हायरल
सोलापूर : सोलापुरातील बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्याच एका कार्यकर्त्याच्या भर स्टेजवर कानशिलात लगवाली आहे. एका कार्यकर्त्याच्या भर स्टेजवर कानशिलात लगावल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
बार्शीत एका क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता आला होता. तो आमदारांच्या चरणावर मस्तक ठेवून लिनही झाला. मात्र, तो जसा पाया पडून वर उठला तशी आमदारांनी त्याच्या कानशिलात लगावली. दरम्यान, आमदारांना या कार्यकर्त्याच्या कानशिलात का लगावली याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र, आमदारसाहेबांच्या पाया पडून कानाखाली प्रसाद मिळालेल्या घटनेचा व्हिडीओ जिल्हाभरात चांगलाच वायरल होत आहे. तसेच एखाद्याने पाया पडल्यानंतर कोणताही व्यक्ती पाया पडणाराची चूक माफ करतो मात्र बार्शीत नेमकं उलट घडलं, पाया पडला आणि कार्यकर्ता कानाखाली प्रसाद घेऊन गेला आहे.



