जळगाव जिल्हाराजकीय

मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अद्याप सुरुच

मुक्ताईनगर (अखिलेशकुमार धिमान) मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अद्याप सुरुच आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एकनाथ खडसे टार्गेट करुन त्रास देत आहेत. त्यामुळे आता सर्व वस्तुस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगणार आहे.

आता बस झाले त्रास सहन करणे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झाले त्रास करणे, असंही सेना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्यावरून त्यांचे वैफल्य दर्शवते. गरीब कुटुंबातील सर्वसामान्य माणूस हा आमदार झाला हे खडसेंच्या जिव्हारी लागलं. नेहमी माझ्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरते. मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्याने माझ्यावर टीका करत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार चालू आहे. ३५ वर्षांपासून मतदारसंघात विकास खुंटला, मी विकास कामे करायला लागलो आणि त्यांना जिव्हारी लागले, अशी तोफही चंद्रकांत पाटील यांनी डागली आहे.

खडसेंचा पलटवार दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निधीचा पाठपुरावा केल्याचे एक पत्र दाखवावे, आमदार खोटारडे आहेत, करंटे आहेत, अशा शब्दात एकनाथराव खडसे यांनी टीकास्त्र सोडले आहे. मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे असे आव्हान माजी मंत्री खडसे यांनी दिले. आम्हीच या कामांचा पाठपुरावा केला होता, असा हल्लाबोल करत खडसे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे