जागतिक मधुमेह दिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रम आणि मधुमेह तपासणी सोबत इतर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते . त्याच धर्तीवर रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे रक्त , शुगर , हिमोग्लोबिन ,बीएमआय इत्यादी तपासणी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर तपासणी शिबीरात रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सदस्यांचे व कुटुंबातील सदस्यांचे रक्त, शुगर ,हिमोग्लोबिन व बीएमआय तपासणी करण्यात आली .शिबिरात रक्त तपासणीसाठी डॉ.वैभव पाटील ( रेणुका पॅथॉलॉजी ) यांनी परिश्रम घेतले तर बीएमआय तपासणी कामी मितेश सुगंधी यांनी परिश्रम घेतले .
शिबिराचे प्रमुख पाहुणे चोपडा आय एम ए चे अध्यक्ष डॉ.महेंद्र जैस्वाल होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले , सचिव रोटे प्रवीण मिस्तरी, खजिनदार रोटे भालचंद्र पवार आदींनी परिश्रम घेतले.