भुसावळ शहरात पोलीस महानिरीक्षक डॉ.बि जी शेखर पाटील यांचा वार्षिक तपासणी निमित्त दौरा संपन्न
गुंडगिरी दादागिरी पोलीस खपून घेणार नाहीत- डाॅ. बी.जी.शेखर पाटील
भुसावळ (अखिलेश धिमान) आज रोजी भुसावळ शहरात पोलीस महानिरीक्षक डॉ.बि जी शेखर पाटील यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला भेट दिली. या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पत्रकारांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याशी संवाद साधले व भुसावळ शहरात प्रथम मोक्का कारवाई करण्यात आली.
यासंदर्भात प्रश्न विचारले असता सहा जणांवर मोक्का लावलेला आहे आणि यापुढे कोणीही असा प्रयत्न करीत असतील तर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आले. यापुढे कुठल्या प्रकारची गुंडगिरी दादागिरी पोलीस खपून घेणार नाहीत. काही दिवसापासून गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे व पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहे ? ज्यांनी हल्ले केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे यापुढे असे होणार नाही असा प्रकार घडल्यास त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल वाढलेल्या शहरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ? पोलिस प्रशासनाच्या रेकॉर्ड प्रमाणे असे कुठलेही प्रमाण वाढलेले नाही व जे काही झाले असेल यावर डीवायएसपी व पोलीस अधिकारी स्पेशल मोहीम राबविणार असल्याची पोलीस महानिरीक्षक डॉ.बि जी शेखर पाटील यांनी दिली. सदर वार्षिक तपासणी दरम्यान जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.