साक्री येथे मराठा सेवा संघातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सभापतींचा सत्कार
साक्री (प्रतिनिधी) साक्री तालुका मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाराज बीज दिनी तुकोबारा यांना अभिवादन व साक्री नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेवक व सभापतींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सक्री तालुका एजुकेशन सोसायटीचे चेअरमन परागदादा बेडसे हे होते, तर प्रमूख पाहूणे म्हणून नगराद्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापू गिते, म.सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक नांद्रे,तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरे,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शितल सनेर, सा.ता.एज्यु. सोसायटीचे सेक्रेटरी व नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अँड. गजेंद्र भोसले उपस्थीत होते. प्रारंभीच राष्ट्रमाता जिजाऊ व जगतगुरू संत तुकोबाराय यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते नगराध्यक्षा शिवमती जयश्री पवार, उपनगराध्यक्ष शिवश्री बापूसाहेब गिते, बांधकाम सभापती अँड. गजेंद्र भोसले, पाणीपुरवठा सभापती शिवमती रेखाताई सोनवणे, आरोग्य सभापती शिवमती मनिषा देसले, शिवमती उज्ज्वला भोसले, महिला व बालकल्यानं सभापती शिवमती संगीता भावसार, शिवमती जयश्री पगारिया, शिवमती उषाताई पवार, शिवश्री दिपक वाघ, शिवश्री प्रविण निकुंभे,शिवश्री डॉ.सचिन नांद्रे व शिवश्री विजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकेतून प्राचार्य बी.एम् भामरें यांनी म.सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने संत तुकोबरायांना बिजदिनी अभिवादन, नव निर्वचीत नगरसेवकांचा सत्कार करुन त्याना भावी काळासाठी बळ व शुभेच्छा देणे तसेच युगपुरूष व सेवा संघाचे संस्थापक, पुरुषोत्तम खेडेकरांचा मराठा सेवा संघ स्थापने मागिल ऊद्देश स्पस्ट करुन, यात साक्री तालुक्यातील उत्तमराव बेडसे, एस्.आर. पाटील व व्ही.एम. भामरे यांचेही योगदान असल्याचे सांगितले.
त्यानी पूढे सेवासंघाच्या कामाचा परिचय करुन देतांना “जय जिजाऊ” हे अभिवादन असल्याचे सांगून संघाचे काम देश व विदेशात 33 कक्षच्या माध्यमातून चालत असल्याचे नमुद करत छत्रपती शिवरायांना अपेक्षितअसलेल्या अठरापगड जातिच्या बहुजनांचा उद्धार करने हा हेतू असल्याचे सांगितले.
या प्रसंगी सत्कारला उत्तर देताना अँड. पूनम काकुस्ते शिंदे व आबासाहेब सोनवणे यांनी मराठा सेवा संघ सारख्या एखाद्या संघटनेने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करन्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगून यातुन अम्हाला छत्रपती शिवरायांसरखे पारदर्शी, विकासाभिमूख व न भूतो न भविष्यती असे कांम करण्याची प्रेरना मिळनार असल्याचे सांगून केलेल्या सत्काराप्रती आभार व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्ररागदादा बेडसे यानी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड बरोबर जिजाऊ ब्रिगेडही सक्रिय करुन गावागावात शाखा विस्तार करण्याचे आवाहन केले. व नवनिर्वाचित नगरसेवकांना उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
साक्रीतल्या न्यु इंग्लीश स्कूल मधे 20 मार्च रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची जिजाऊ वंदनेने सुरुवात करण्यात आली, ज्याचे सूत्रसंचालन पी.झेड् कुवर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव डॉ.सचिन नांद्रे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवासंघ व संभाजी ब्रिगेडच्या अनिल अहिरे, विकास सोनवणे, सुनिल देवरे, योगेश खैरणार, अतुल दहिते, जितेंद्र अहिरराव, कैलास नेरकर, निलेश सोनवणे, योगेश सोनवणे, दिपक सोनवणे आदि पदाधिकारिनी परिश्रम घेतले.