बोरद येथील मुख्य बाजार पेठेत तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
तळोदा (प्रतिनिधी) बोरद येथे युवासेनेतर्फ तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. बोरद येथील नावयुवकांनी एकत्र येत शिवजयंतीची जयंत तयारी केली.या वेळी शिवप्रतिमेचे पूजन पोलीस कर्मचाऱ्यांकडून करून या सोहळ्याला सुरवात करण्याचा त्यांचा मनोदय होता. त्याच दृष्टिकोनातून बोरद दुरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल गौतम बोराडे यांच्या हस्ते शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून, पूजन करण्यात आले. याप्रसंगी युवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय शिवाजी’, ‘जय भवानी’ व ‘जय श्रीराम’ असा जयघोष करण्यात आला.
याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, पोलीस कॉ.निलेश खोंडे, राजू जगताप यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गावातील रवींद्र भिलाव, दिपक पाटील, रोहित पाटील, कैलास राजपूत, कमलेश पवार, किसन कोळी, धनंजय राजपूत, निलेश राजपूत, छगन कोळी, दिपक जाधव, राज जोहरी, हंसराज जोहरी, नितीन जोहरी, संजय मोरे, नितीन पाटील, दिनेश राजपूत, भावेश लोहार इत्यादी तरुण मंडळी यावेळी उपस्थित होती. या प्रसंगी बोरद बाजार पताक्यांनी सजवून भगवामय करण्यात आला होता.