आ.साहेब आमची विजेची समस्या दूर करा ; त्रस्त शेतकऱ्यांचा स्वर !
खेडदिगर येथे आ.राजेश पाडवी यांच्या तक्रार निवारण बैठकीत शेतकऱ्यांची मागणी
शहादा (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांना कमी दाबाच्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठेबाबत निवेदन दिले असून इतर समस्यांचाही पाडा शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या पुढे वाचला. आ. राजेश पाडवी यांनी खेडदिगर येथे भेट दिली व शेतकऱ्यांच्या व व्यापारी गण याना कमी दाबाच्या वीज पुरवठे बद्दलच्या विविध समस्या जाणून घेतल्या
परिसरातील शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना सुलतानपूर येथील वीज वितरण महामंडळाच्या सब स्टेशन द्वारे विद्युत पुरवठा केला जातो. सुमारे वीस गावांना येथून शेती पंपासाठी आणि औद्योगिक कामासाठी वीज पुरवठा केला जातो. त्यातील काही गावे सबस्टेशन पासून वीस किलोमीटर अंतरावर आहेत.रायखेड, खेडदिगर, कोचरा, कुरंगी, गोदीपुर, चांदसैली ब्राह्मणपूरी सुलतानपूर सुलवाडे, मुबारकपुर, आडगाव, गणोर, बहिरपूर, बिलाडी, खरगोन, टवळाई या गावांच्या शेतीपंपांना अत्यंत कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे. वीज पुरवठा वारं-वार खंडित होणे शिवाय मोटारी जळणे त्यातच थकित वीज बिलापोटी, महावितरण कंपनीकडून विज जोडण्या कट करणे यासारख्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. थकित विज बिल असलेल्या शेतकऱ्यांनी कमीत कमी दहा-दहा हजार रुपये भरा अशी सूचना मंडळाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली होती त्याप्रमाणे पैसे भरूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. या परिसरातील शेत जमिनीची प्रत चांगली असून येथे बाराही महिने, ऊस, कापूस, पपई,केळी यासारखी पिके घेतली जातात शिवाय रब्बी हंगामातील पिके ही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने शेती पंपाना विजेची अधिक गरज असते. शिवाय येथे खेडदिगर परिसरात झपाट्याने औद्योगिक क्षेत्र वाढत असल्याने विजेची मागणी वाढत असून औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशे सहकार्य आपल्या कढणं मिळावे अशी अपेक्षा व्यापारी वर्गाने व्यक्त केली.
सतत च्या खंडित वीज पुरवठा व कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने आर्थिक तोटा सोसावा लागतो ह्यासारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ह्या समस्यांचे निराकरण व्हावे असे निवेदनात म्हटले असून प्रत्यक्ष तक्रारीदेखील करण्यात आल्या. आमदारांनी शेतकऱ्यांना, “आपल्या समस्याचे लवकरच निराकरण करू” असे आश्वासन दिले. या वेळी परिसरातील प्रगतीलशील शेतकरी,आनंद पाटील, मनिष पाटील, विलास पाटील, योगेश पाटील, हिरालाल पाटील, हिरालाल ईशी, संजय भामरे, ईश्वर बागुल, शांताराम मगरे, गुलाब सावळे, ऋषिकेश पाटील, शांतीलाल पाटील, पिंटूभाई पाटील, घनश्याम पाटील, भीमराव सावळे तसेच व्यापारी मुकेश टाटिया, चेतन भाई, शांतीलाल बाफना, इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.