महाराष्ट्र
येवती ग्रामपंचायत विकास कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न
बोदवड (सतीश बाविस्कर) बोदवड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या येवती ग्रामपंचायत विकास कामाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
बोदवड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या येवती ग्रामपंचायत विविध विकास कामाचा १५ वित्त आयोगातून सिमेंट काँक्रिटीकरण रोडचे काम चालू करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून येवती ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम वाघ, ग्रामसेवक गणेश चोले, सदस्य सुदाम निळे, उखा शेजोळे, कडू सुकाळे, योगेश माळी, सागर शेजोळे, विनोद शिंदे, देशदूत वार्ताहार, बापू ठाकूर, नारायण ठाकूर, बबलू ठाकुर हे उपस्थित होते.