महाराष्ट्र

खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा पडला पार

प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत खेचून आणला निधी

उमरखेड (निलेश ढाणकी) हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी उमरखेड तसेच महागाव तालुक्यातील विकास कामासाठी 19 कोटी 44 लक्ष रुपयाचा निधी खेचून आणला असून या कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 19 मार्च रोजी उमरखेड महागाव दौऱ्यादरम्यान केला.

उमरखेड तालुक्यातील अतिशय दयनीय अवस्था असलेल्या ढाणकी- गांजेगाव- शिंदगी -ब्राह्मणगाव या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सात कोटी चौपन्न लक्ष रुपये मंजूर झाले असून या रस्त्याचे उद्घाटन या वेळी खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी केले. त्यानंतर ढाणकी ते सावळेश्वर या रस्त्याच्या कामाचे सुद्धा त्यांनी यावेळी लोकार्पण केले. तसेच करंजी सावळेश्वर चिंचोली ढाणकी या रस्त्याचे खासदार हेमंत पाटील यांनी उटघाटन केले. खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे उमरखेड तसेच महागाव तालुक्यासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला असून आता यामुळे गावांचा कायापालट होणार आहे.

उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते सावळेश्वर, तसेच ढाणकी ते गाजगाव या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती. याबाबत विविध वृत्त पत्रात बातम्या प्रकाशित सुद्धा होत होत्या. या गंभीर बाबी कडे खासदार हेमंत पाटील यांनी लक्ष देऊन ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याची मंजुरात मिळवली असून या कामाच्या लोकार्पण सोहळा त्यांनी पार पडला. खासदार हेमंत पाटील यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे उमरखेड तसेच महागाव तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

या उद्घाटन सोहळ्याला तालुक्याचे विद्यमान आमदार नामदेव ससाने, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य चीतंग राव कदम, बळीराम मुटकुळे, सतीश नाईक, संदीप ठाकरे, राजेश खामनेकर, विशाल पांडे, रवी रोडे, नीलेश जैन,सचिन साखरे, गांधी शहर प्रमुख बंटी जाधव, तालुका युवा सेना प्रमुख संभाजी गोरटकर, विशाल नरवाडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे, ढाणकी भाजपा शहराध्यक्ष रोहित वर्मा, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे