महाराष्ट्रराजकीय

Goa CM : गोव्याची धुरा अखेर प्रमोद सावंत यांच्या हाती, सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

पणजी (वृत्तसंस्था) नुकतीच देशात गोवा, उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांतील निवडणूक पार पडली. 10 मार्च रोजी निकालही समोर आल्यानंतर आता एक-एक करुन राज्यांचे मुख्यमंत्री निश्चित होत आहे. गोव्यातील मुख्यमंत्री पदाची धुरा पुन्हा एक प्रमोद सावंत यांच्या हातीच भाजपने सोपवली आहे. नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सावंत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

गोव्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. गोवा विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या भाजपच्या आमदारांची बैठकही काही दिवसांपूर्वी पार पडली होती. यावेळी जवळपास प्रमोद सावंत यांच्या नावाचीच चर्चा होती. त्यानंतर आता अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली आहे.

प्रमोद सावंत यांचा राजकीय प्रवास

डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द कोल्हापुरातूनच सुरू झाली. जेव्हा ते येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीस (GS) पदाची निवडणूक जिंकून आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. बारावीपर्यंत गोव्यात शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी 1991 मध्ये कोल्हापूरच्या रंकाळवेश दुधाळी परिसरात असलेल्या गंगा आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी ते रंकाळा परिसरात भाड्याने राहत होते.

प्रमोद सावंत यांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांच्या महाविद्यालयातील मित्र परिवाराने त्यांना 1992 मध्ये सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी जिंकले. यातून खर्‍या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1997 मध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ ही पदवी मिळवली. त्यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे