पुन्हा एकदा राष्ट्रवादी ; २३ मार्च पासून स्नेहमीलन यात्रेस जिल्ह्यात प्रारंभ
तळोदा (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांची गाठ जुळवूया! चला पुन्हा एकदा राष्ट्रवादी होऊ या असा नारा देत जिल्ह्यात राष्ट्रवादी स्नेहमीलन यात्रेला दि.२३ मार्च पासून सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या यात्रेत सहभागी होऊन शहरात व ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागायचे आहे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी तळोदा येथे झालेल्या स्नेहमीलन यात्रेच्या बैठकीत केले.
या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून माजी आ.तथा राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, शहराध्यक्ष योगेश मराठे, जि.प. सदस्य मोहन शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, डॉ.रामराव आघाडे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, युवा नेते संदीप परदेशी, तालुका अध्यक्ष डॉ.पुडलीक राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, शहादा तालुका अध्यक्ष माधव पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण केसरसिंग क्षत्रिय हे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस स्नेहमीलन यात्रा नंदुरबार जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गटात होत आहे. त्यासंदर्भात आज तळोदा येथील राष्ट्रवादी कार्यालय येथे राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.अभिजित मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, येत्या २३ मार्च पासून आपल्या नंदुरबार, शहादा, व अक्कलकुवा असे तीन टप्पे करण्यात आले असून या तिन्ही तालुक्यात गावोगावी फिरून आपल्याला राष्ट्रवादी च्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांशी भेट घेऊन चर्चा करन्यात येणार आहे. तसेच एकेकाळी नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष हा फार मोठा होता तसेच गावोगावी पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काही कारणाने हा पक्ष मागे पडला होता परंतु आता पुन्हा आपल्याला जोमाने कामाला लागून आता पुन्हा राष्ट्रवादी पक्ष हा गावोगावी व खेडोपाडी पोहचवून पुन्हा एकदा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष हा नंबर एक वर आणायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांनी नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथील संपूर्ण ५६ जिल्हा परिषद गटामध्ये फिरून लोकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वांनी या स्नेहमीलन च्या यात्रेत सहभागी होऊन नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची गाठ जुळवून आणायचे आहे. असे आवाहन अभिजित मोरे यांनी यावेळी केले. यावेळी या बैठकीला मुकेश पाडवी, सोनू सोनवणे नितीन मराठे, आदिल शेख, याकूब पिंजारी, शाबीर मिस्तरी, रफिक शेख आदी राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.