आर्वी येथील श्रीमती एस.एस. शेणगे परिवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
आर्वी (प्रतिनिधी) येथील श्रीमती एस.एस. शेणगे परिवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली व कोव्हिड लसीकरण मोहीम शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका यू.एस.पाटील होत्या.
कार्यक्रमा निमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ याविषयावर वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींसाठी कोव्हिड लसीकरण मोहीमेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्कूल कमिटी चेअरमन बापूसाहेब खुशाल सुकदेव पाटील, ज्येष्ठ संचालक दादासाहेब बारकु निंबा पाटील, आर्वीचे सरपंच बापूसाहेब नागेश नामदेव देवरे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब जिभाऊ शेणगे, प्रा.आरोग्य केंद्र आर्वी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री, मिलिंद पाटील आरोग्य सेवक, वळवी सिस्टर , शाळेचे मुख्याध्यापक वाय.जी.खैरनार नाना, उपमुख्याध्यापक ए. डी.खैरनार नाना, पर्यवेक्षक एन.एस.कर्वे, सर्व शिक्षक बंधू भगिनीं, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्य क्रमाचे सूत्रसंचालनआर. एल.बोराळकर यांनी केले.