गुन्हेगारीमहाराष्ट्र
येवती येथील जि.प. मराठी शाळेतील ३२ इंची एलसीडी टीव्ही चोरण्याचा प्रयत्न
येवती (प्रतिनिधी) येवती येथील जि.प. मराठी शाळेच्या इयत्ता चौथी च्या वर्ग खोलीच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी वर्गातील ३२ इंची एलसीडी टीव्ही चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र टी व्ही भिंतीवर फिट केलेला असल्याने चोरट्यांचा हेतू अयशस्वी झाला.
तसेच खोलीतील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील साहित्य फेकले. हा प्रकार रविवारी रात्री घडला असावा. सोमवार रोजी गोपाळ सुर्यवाड हे शिक्षक शाळेत आल्यावर हा प्रकार लक्षात आला त्यांनी याबाबत सरपंच शांताराम वाघ, पोलीस पाटील यांना कळवले. मुख्याध्यापिका रजेवर असल्याने अद्याप पोलीस तक्रार करण्यात आली नव्हती.