विरभाई कोतवाल यांच्या 79 वी पुण्यतिथी साजरी
नाभिक समाज भवन उभारण्यासंदर्भात महत्त्व पूर्ण बैठक संपन्न...
दोंडाईचा (प्रतिनिधी) शहरातील नाभिक समाज युवक मंडळ व हितवर्धक संस्थेच्या वतीने हुतात्मा विर भाई कोतवाल यांची 79 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर बऱ्याच वर्षापासून नाभिक समाज भवन बांधकामाचा विषय प्रलंबित असल्याने आज त्यावर महत्त्व पूर्ण बैठक घेण्यात आली.
नाभिक समाज रत्न हुतात्मा विर भाई कोतवाल यांची 79 वी पुण्यतिथी शहरातील औंदबर कॉलनीत राहणारे शशिकांत खोंडे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा युवक मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. नाभिक समाजाचे शहर अध्यक्ष छोटू महाले, दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, मुरलीधर बोरसे, महिला अध्यक्ष वत्सलाबाई चित्ते आदींनी नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज व हुतात्मा विर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी हुतात्मा विर भाई कोतवाल यांच्या चरित्र्यावर प्रकाशझोत टाकण्यात आली.
नाभिक समाज भवन बांधकाम संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत गेल्या कित्येक वर्षांपासून नाभिक समाज भवन बांधकामाचा विषय रेंगाळत पडला होता. शासन स्तरावरून निधी मिळण्यास अळचन प्राप्त होत असल्याने कर्तव्यनिष्ठ अध्यक्ष छोटू महाले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आज हुतात्मा विरभाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीचे अवचित साधत बैठक घेत. समाजाचे भवन बांधकामाला निधी कशाप्रकारे गोळा करून बांधकाम करता येईल मार्गदर्शन करत समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान या समितीने अध्यक्ष रविंद्र चित्ते यांना सर्वानुमते जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून किरण सुर्यवंशी तर सचिव अनिल ईशी यांना करण्यात आले आहे.
याप्रसंगी दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रविंद्र चित्ते, शहर अध्यक्ष छोटू महाले, युवक मंडळाचे अध्यक्ष समाधान ठाकरे, दुकानदार संघाचे शहर अध्यक्ष किरण सुर्यवंशी, महिला मंडळ अध्यक्षा वत्सलाबाई चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, मुरलीधर बोरसे, शहर उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, शहर सचिव कैलास चित्ते, खजिनदार सुनील सैंदाणे, युवक मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश बोरसे, सचिव गणेश पवार, बन्सीलाल चित्ते, अनिल ईशी, देविदास चित्ते, दिलीप सैंदाणे, गोकुळ सैंदाणे, भगवान चित्ते, राजेंद्र सैंदाणे, अशोक सोनवणे, धनराज वारुळे, भरत सैंदाणे, बन्सीलाल मोरे, राजेंद्र मोरे, संजय सैंदाणे, श्रावण भदाणे, भोला सैंदाणे, विशाल महाले लोटन पवार, बालू मोरे, राजेश मिस्तरी, मच्छिंद्र पवार, मुकेश चित्ते, जगदीश ईशी, दिपक सैंदाणे, गोपाल बोरसे, रमेश खोंडे, संदीप पवार, सोनू पवार, पंकज सैंदाणे, अनिल चित्ते, गुलाब पवार, अर्जुन सैंदाणे, अजय पवार, रोहित सैंदाणे, अतुल भदाणे, नितीन सुर्यवंशी, अजय ईशी यासह आदी समाज बंधू उपस्थित होते. तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळाचे अध्यक्ष समाधान ठाकरे, उपाध्यक्ष दिनेश बोरसे, सचिव गणेश पवार, शशिकांत खोंडे, यासह आदींनी मेहनत घेतली.