आम आदमी पार्टीद्वारे नागपूर शहरात बंद पडलेल्या CNG बसेस शुरू करणे व विभागातील अनियमितता थांबविण्याबाबत मनपा आयुक्त यांना निवेदन
अमरावती (महेंद्रसिंग पवार) नागपूर शहरात चांगली बस सेवा मिळावी याकरिता सकरात्मक भूमिका घेवून मा आयुक्त यांनी दिल्लीतिल बस सेवा कोणत्या प्रकारे चलविल्या जाते त्याचेही सुझाव दिल्यास आपण लागू करण्याचे आश्वासन दिले.
आम आदमी पार्टी द्वारे नागपूर शहरात बंद पडलेल्या CNG बसेस शुरू करणे व विभागातील अनियमितता थांबविण्याबाबत मनपा आयुक्त श्री बी राधाकृष्ण यांना विदर्भ अध्यक्ष डॉ देवेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वात निवेदन देवून नागपूर शहरात आपली बस सेवा सुधारणे व चालक आणि कंडक्टर यांना बरोबर वेतन मिळावे याकरिता चर्चा करण्यात आली. या वेळी संयोजिका कविता सिंघल, महाराष्ट्र आय. टी. सेल अध्यक्ष अशोक मिश्रा, मध्य नागपूर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल, उत्तर नागपूरचे अध्यक्ष रोशन डोंगरे, सचिव गुणवंत सोमकुंवर, संघठन मंत्री प्रदीप पौनीकर, युवा अध्यक्ष पंकज मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरात आवागमन करिता ‘आपली बस’ शुरू आहे. शहरातील प्रत्येक भागाला जोडण्यासाठी, व्यक्तिगत वाहने कमी व्हावेत, प्रदूषण कमी करणे आणि सार्वजनिक वाहतूक वाढावी हा उद्देश ठेवून ठेकेदारांना बस चालविण्याचा ठेका दिलेला आहे. परंतु मनपाच्या इतर विभागा प्रमाणे या विभागात भ्रष्टाचार होत असल्यामुळे सामान्य जनतेला दिली जाणारी बस सेवा नेहमी बंद पडत आहे.
ठेकेदार आपली कमाई वाढविण्यासाठी बसेसची देखभाल बरोबर करीत नसल्याने बसेस खराब होत आहेत. परिवहन विभाग त्यांच्यावर कार्यवाही न करून पर्यावरणाचा नावाखाली बसेसला सीएनजी मध्ये परिवर्तन करून चालवीत आहे. CNG चे दर वाढल्यामुळे ठेकेदाराने CNG वर चालणाऱ्या शहराचे कितीतरी मार्ग बंद करून ठेवले आहेत. यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि मनपाचा परिवहन विभाग नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदीच्या घोटाळ्यात व्यस्त आहे.
महापालिकेच्या परिवहन विभागांतर्गत शहरात 237 यापैकी फक्त 70 बसेस सीएनजी मध्ये बदलण्यात आल्या. मागच्या वर्षी परिवहन सभापती यांनी पूर्ण बसेस सीएनजी मध्ये परावर्तीत करू असे विधान दिले होते, पण त्याचे काही झाले नाही. नवीन इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी प्रक्रिया शुरू असून काही बसेस मिळालेल्या आहेत आणि काही मिळणारे आहेत. पण प्रसाशनाला भ्रष्टाचार थाबवून नवीन बसेसच्या देखभालीच्या व्यवस्थाकडे बारकाईने लक्ष द्यावे. ठेकेदार फक्त पैसे कमवून बसेसला भंगारात टाकणार नाही याची काळजी घ्यावी.
पैसे कमविण्यासाठी ठेकेदार वारंवार बसेस खराब करून मार्ग बंद पाळतो त्यामुळे चालक आणि वाहक यांना काम नाही हे सांगून पगार देण्यात येत नाही यामुळे कामगारांना त्रास होतो.
एकूणच परिवहन विभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्याप्रमाणात बोगस कारोबार चालू असून विभाग घाट्यात असल्याचे आपल्या आर्थिक अहवालात दिसून येते. आपली बस सेवेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना चांगली सेवा मिळावी, खाजगी वाहने कमी होऊन रस्तावरील वाहतूक कमी होणे आणि पार्किंग चा प्रश्न सुटेल तसेच इलेक्ट्रिक व CNG बसेस पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात यावेत, बोगस कारोबार करणारे ठेकेदारांचे ठेका रद्द करून स्वतः बस सेवा चालवावी आणि गैरव्यवहाराची चोकशी करून दोषांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी ही मागणी आपतर्फे करण्यात आली.