शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सहकार पॅनलला १३ पैकी ९ जागांवर विजयश्री
शेतकरी विकास पॅनलचे चार जागांवर विजय
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेले विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू होते परंतु गेल्या तीस वर्षात पूर्वीची बिनविरोध होण्याची परंपरा खंडित करून अखेर निवडणूक लादली गेली म्हणून निवडणुकीत सहकार पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत झाली. दोन्ही पॅनल मध्ये जोरदार प्रचार केला होता. अखेर मतदारांनी सहकार पॅनल ला तेरापैकी नऊ जागांवर विजय संपादन करून स्पष्ट बहुमत दिले.
शेतकरी विकास पॅनल चार जागांवर समाधान मानावे लागले. येथील बहुचर्चित विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चेत होती यात माजी नगराध्यक्ष दीपक दादा देसले यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल व नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे सहकार पॅनल स्थापना झाली होती. निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली होती मात्र शेतकरी मतदार राजाने योग्य उमेदवाराला मतदान करून मदत केली काल झालेल्या निवडणुकीत सकाळपासून दुपार चार पर्यंत मतदान पार पाडले.दोन्ही पक्षाकडून मतदारांना आपलेसे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते त्यानंतर पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम. दशपुते यांच्या देखरेखीखाली पार पडली. सुरुवातीला भटक्या विमुक्त जातीसाठी एका जागेवर मतमोजणी होत पहिला निकाल सहकार पॅनल च्या बाजूने लागला त्यात सूर्यवंशी दिनेश बंडू व हिरालाल गोविंदा भोई यांच्यात झाली त्यात सूर्यवंशी दिनेश बंडू यांना 279 तर हिरालाल गोविंदा यांना 275 मते मिळाले अवघ्या चार मतांनी सूर्यवंशी दिनेश बंडू विजयी झाले. यानंतर अनुसूचित जातीसाठी या एक जागेसाठी राजधर मोतीराम कसबे यांना 265 तर बोरसे बंशीलाल पितांबर यांना 283 मिळाली. महिला प्रतिनिधी दोन जागांसाठी अत्यंत चुरशीची चौधरी चिंधाबाई पोपट ,चौधरी मंजुळाबाई श्रीराम,चौधरी मनिषा राकेश, मराठे आशाबाई भगवान यांना अनुक्रमे 237, 254, 281, 287 अशी मते मिळाले ,त्यात पहिल्या क्रमांकावर मराठे आशाबाई भगवान तर दुसऱ्या क्रमांकावर चौधरी मनिषा राकेश हे सहकार पॅनल मधून विजय झाले यात सासु सुनेची लढत रंगतदार झाली होती. त्यात सहकार पॅनलचे सुनेने म्हणजेच चौधरी मनिषा राकेश यांनी विजयश्री खेचून आणली. इतर मागास प्रवर्ग आधीच सहकार पॅनल चे बागवान इलियास बशीर यांनी शेतकरी प्राण्यांचा पाठिंबा दिल्याचा दिल्याचे पत्र प्रसिद्ध केले असले तरी बागवान इलियास बशीर यांनी अखेर चुरस निर्माण करत देसले सचिन चंद्रकांत यांना चांगलेच आव्हान दिले होते म्हणून देसले सचिन चंद्रकांत यांना 326 बागवान इलियास बशीर यांना 229 मिळाले. सर्वसाधारण आठ जागेसाठी निवडणूक अत्यंत चुरशीची होत सहकार पॅनल 5 तर शेतकरी विकास पॅनल ला तीन जागा मिळाल्या. त्यात चौधरी दगा तानका यांना 250 ,चौधरी प्रकाश रतन 240 ,पाटील सदाशिव नागो 271, रमेश चिंतामण भामरे 245 ,युवराज नामदेव माळी 238,तर शेतकरी विकास पॅनलचे पाटील दिलीप आधार 252 ,प्रकाश नथ्थु पाटील 242, पाटील मनिष कालिदास 269, मतांनी विजय संपादन केला. एकंदरीत 13 जागांसाठी सहकार पॅनल सर्वसाधारण गटातून पाच, अनुसूचित जाती 1 ,महिला प्रतिनिधी दोन ,भटक्या विमुक्त जातीमधून एक, असे 9 तर शेतकरी विकास पॅनल ला इतर मागास वर्ग एक तर सर्वसाधारण गटातून तीन असे चार जागांवर विजय संपादन केला.मतमोजणी संपल्यावर सहकार पॅनलचे प्रमुख गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात सर्वच विजयी उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
यावेळी प्रकाश चौधरी व रावसाहेब आनिल वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना प्रथम शेतकरी मतदारांचे जाहीर आभार मानतो निवडणूक ही लादलेली निवडणूक होती आम्हाला निवडणूक लावायची नव्हती तर बिनविरोध करून विरोधकांना आठ जागा देण्यास तयार होतो आणि आम्ही चार जागा घेण्यास तयार होतो मात्र त्यावर ते राजी झाले नाही म्हणून ही निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत आम्हाला पाहिजे असलेली चार उलट त्यांनाच चार उमेदवार देऊन मतदारांनी चपराक दिली आहे. येणाऱ्या काळात शेतकरी हितासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देवु व विकासात्मक कामे करण्यासाठी तत्पर राहू असे त्यांनी सांगितले. निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. दशपुते यांच्या देखरेखीखाली संपन्न झाली यासाठी सचिव धनराज शिरसाठ, अमोल शिंपी , प्रमोद बोरसे,दगाजी पवार, सुशिल पावरा, कृष्णराव पाटील,नंदु पाटील, सुशिल महाजन, दिनेश देशमुख आदी कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी काम पाहिले.