बारी समाजाचे आराध्यदैवत संत श्री रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी
जामनेर (ईश्वर चौधरी) जामनेर तालुक्यातील पहूर येथे बारी समाजाचे आराध्य दैवत संत श्री रूपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी संत श्री गाडगेबाबा महाराज मंदिर येथे पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला संत रुपलाल महाराज पहूर गावे जन्मभूमि असल्याने त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीपभाऊ लोढा, जिल्हा परिषद सदस्य राजधरभाऊ पांढरे, पहूर पेठचे उपसरपंच शामभाऊ सावळे संत श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे अध्यक्ष कडुबाबाबा पाटील, अॅड. एस आर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख शैलेशभाऊ पाटील, उपसरपंच रवीभाऊ मोेरे, ग्रामपंचायत सदस्य शरदभाऊ पांढरे, शिवसेना तालुका प्रवक्ते गणेशभाऊ पांढरे, विकास सोसायटीचे चेअरमन गोकुळभाऊ कुमावत शिवसेना शहरप्रमुख संजयभाऊ तायडे, संत श्री रुपलालमहाराज यांचे वंशज वसंतभाऊ बुंधे, भानुदास बुंदे, पहुर पेठचे सरपंच तुकाराम बारी, अर्जुन बारी, राजू आगे, माधवभाऊ बारी गजानन बारी, दिपक बारी, राजू दातीर, विनोद बारी, शांताराम बारी, प्रकाश बारी, रघुनाथ बारी, किशोर बारी, शामरावदादा बारी, अमृत बारी, वसंत बारी, दिनकर बारी, सुनील बारी व सर्व समाजबांधव व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक रमेश नागपूरे यांनी केले व आभार ग्रामपंचायत सदस्य ईश्वरभाऊ बारी यांनी मानले. याप्रसंगी बारी समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.