जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्रमांक २ आणि ४ तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित
चोपडा (विश्वास वाडे) शिक्षणविभाग महाराष्ट्र राज्य, आरोग्यविभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयुंक्त विदमाने जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा होण्याचा दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.
त्या निमित्ताने आज जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा न २ व ४ नंबर चोपडा ला ब्रॅण्ड एम्बेसेडर ,जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर यांनी भेट दिली. आणि तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी मार्गदर्शन केले व रोटरी क्लब चोपडा तर्फे तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी देण्यात आलेले बैनर दिले व शाळांना तंबाखू मुक्त केले. या अभियानात गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, उर्दू केंद्र प्रमुख चौहान, विस्तार अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले वेळी मुख्यध्यपक नईम, गफूर खान तडवी, सय्यद जफर अली, शेख कादर, अल्ताफ, जावेद खान उपस्थित होते.