डी एस जी लाईव्ह केअर फाउंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व इ श्रम कार्ड नोदणी व झिरो बॅलेन्स अकाउंट
शहापूर (देविदास भोईर) जागतिक महिला दिन निमित्त डी एस जी लाईफ केअर फाउंडेशन च्या वतीने फुलेनगर एक, व आंबेडकर नगर, येथे लावण्यात आलेला आरोग्य तपासणी शिबिर व इ श्रम कार्ड आणि झिरो बॅलन्स अकाउंट आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न झाला.
या शिबिराचे उद्घाटन DSG लाइफ केअर फाउंडेशन चे संपादक दत्ता श्रीरंग गायसमुद्रे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आला. त्यानंतर DSG लाइफ केअर फौंडेशन कार्यकर्ता ज्यांनी समाजासाठी आपल्या गावासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेले आहे. DSG लाइफ केअर फाउंडेशन ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुरेखा आनंद बोराडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. व महिलांना कोणते अधिकार आहेत याची माहिती हिना दत्ता गायसमुद्रे यांनी दिली. त्यानंतर दिवस भरात उपस्थित राहिलेले मान्यवर DSG लाइफ केअर फौंडेशनचे महासचिव गीता प्रेमचंद सोनी, DSG लाईव्ह केअर फाऊंडेशनचे समाजसेविका आरती गायसमुद्रे, DSG लाईव्ह केअर फाउंडेशन चे युवा जिल्हाध्यक्ष कू अक्षय खंकाळ, DSG लाइफ केअर फाऊंडेशनचे कार्यकर्ता अभय रवींद्र जाधव व त्यांच प्रमाणे सर्वे DSG लाइफ केअर फौंडेशनचे कार्यकर्ता हे ही उपस्थित होते. रेश्मा जाधव, मोहनलाल गुप्ता, भावना जाधव, पिंकी पाटील, सुरेश गायसमुद्रे, जितेश साळवी, रेखा गायसमुद्रे, मीना गायसमुद्रे, आशा सुरवसे, आणि संपूर्ण साई धाम हॉस्पिटल मानकोली Dr. अब्दुल रखिब जे शेख व विमला हॉस्पिटल डॉ. अनुप मिश्रा व एकता फाउंडेशन पूनम राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.