चोपडा येथील कॅन्सरग्रस्त राज मोहम्मद खान शिकलगर यांनी कॅन्सरवर मात करून संघर्षमय जीवनाला बनविले प्रेरणादायी जीवन
पुढचे आयुष्य समर्पित केले कॅन्सर जनजागृती व व्यसनमुक्ती अभियानसाठी
चोपडा (विश्वास वाडे) कॅन्सर ज्याचा नाव ऐकून भल्या भल्याची भांभेरी उडते व परिवार उध्वस्त होऊन जाते मृत्यूचा दाढेत रुग्ण जातो पैसा ही जातो आणि रुग्णाचा नातेवाईकांना मानसिक त्रास पण सहन करायला लागतो आणि रुग्ण वाचेल की नाही याची शाश्वती नसते. पण कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर हिंमतीने मात होऊ शकते व कॅन्सरला कॅन्सल केले जाऊ शकते असेच जिवंत उदाहरण आज जागतिक कॅन्सर दिनानिमित्त व्यसन मुक्ती अभियानात राज्यात नावलौकिक मिळवणारे चोपडा शहरातील अमूल्य सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांचा बाबतीत देता येईल.
राज मोहम्मद यांना २०१० मध्ये तंबाखू, गुटखाच्या व्यसनमुळे तोंडाचा कॅन्सर झाला होता. त्यांना निदान उशिराने झाल्याने आजार वाढला होता. नातेवाईक, मित्रपरिवार राज मोहम्मदसाठी प्रार्थना करत होते. मृत्यूला जवळ बघून आणि आपल्या कडून झालेली चूक ज्याचा मुळे पूर्ण परिवार उध्वस्त होण्याचा मार्गावर होते. नातेवाईक व मित्रमंडळीची जिव वाचविण्यासाठी धडपड बघून राज मोहम्मदला पश्चाताप होत होता ते रडून अल्लाह कडे जीवनाची भीक मागत होते. अल्लाह मला भिक्षेत आयुष्य दे जे चूक माझा कडून झाली दुसऱ्या कडून होणार नाही. त्यासाठी माझा आयुष्य समर्पित करेन व कॅन्सरग्रस्तांना योग्य असा मार्गदर्शन करेन अल्लाहने त्यांची रडून केलेली प्रार्थना ऐकली व भिक्षेत आयुष्य बोनस म्हणून दिले.
२०१२ पासून त्यांचा संघर्षमय जीवनाची नवीन पारी सुरू झाली. त्यांनी केलेली प्रतिज्ञा अनुसार महिनीतील १२ दिवस कॅन्सरग्रस्त लोकांची मदद व मार्गदर्शन साठी आणि ज्याचा मुळे कॅन्सर सारखा जीवघेण्या आजारात जकडलो त्या तंबाखू, गुटख्याची ची नायनाट करण्यासाठी राखीव ठेवले ऊन,पाऊस, थंडी असो राज मोहम्मद दिलेल्या शब्दाला बांधील राहिले एक भाग पूर्ण कापला गेला असताना सुद्धा रुग्णाने घरून आणलेला डब्यात त्याचा सोबत जेवण करून त्यांना जीवन जगण्यासाठी उतेजना ,व हिम्मत देतात मि जगू शकतो तुमचा सोबत येऊ शकतो तर तुम्ही ही या आजारावर मात करून आपल्या परिवार सोबत चांगला जीवन जगू शकतात असे समुपदेशन करतात आता पर्यंत राज मोहम्मद खान शिकलगर यांनी ८०० च्या वरती कॅन्सर रुग्णांना मदद, योग्य असा मार्गदर्शन केले आहे त्यांचा कॅन्सर पेशनट हेल्प सेंटर द्वारे मदती चे जाळे जळगाव, धुळे ,नंदुरबार , नाशिक, मुंबई, ठाणं, पुणे, औरंगाबाद सातारा, सांगली ,परभणी, बुलडाणा, अकोला ,सोलापूर, रायगड ,महाड, अहेमदनगर, नागपूर,व इतर जिल्ह्यात व मध्यप्रदेशात पसरले आहे.
इतके जिल्ह्यातील रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले आहे त्याच्यातून भरपूर रुग्ण कॅन्सर सारखाय जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या परिवारा सोबत जीवन सुखसमाधाने जगत आहेत. तंबाखू गुटखा विरोधी अभियान राबवत असताना राज मोहम्मद याने आपली भावी पिढी व्यसनमुक्त कशी करता येईल या साठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ते आता शिक्षणविभाग महाराष्ट्र राज्य आरोग्यविभाग ,सलाम मुंबई फाउंडेशन ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा च्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा करण्यासाठी धडपड करत आहेत. आता जिल्हा महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
या अभियानात राज मोहम्मद शिकलगर यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक तत्कालीन डॉ एन, एस, चौहान , नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी चौहान, जिल्हा आरोग्यधिकारी, महानगरपालिका आयुक्त, अन्न भेसळ विभाग उपायुक्त, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रणचे जिल्हा सल्लागार डॉ नितीन भारती, सलाम मुंबई फाउंडेशनचे संजय ठाणगे, जयेश माळी, सलाम मुंबईचे जळगाव जिल्ह्याचे समनव्यक संदीप खरात, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षचे राहुल ब्राहाटे, प्राची, निशा कटरे, उपशिक्षणधकारी सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी अधिकारी, सर्व तालुका आरोग्यधिकारी, विस्ताराधिकारी, तज्ञ शिक्षक, सर्व केंद्रप्रमुख साहेब, सर्व मुख्यध्यपक, सर्व शिक्षक बंधू,भगिनीचे व जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे.
राज मोहम्मद जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचे सदस्य आहे. जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान चे जिल्हा ब्रॅण्ड एम्बेसेडर आहे. जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळा अभियान चे मार्गदर्शक आहे. जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडाचे अध्यक्ष, कॅन्सर पेशंट हेल्प सेन्टर, कॅन्सर पेशंट पुनर्वसन केंद्र चे संचालक आहे. आता पर्यंत ३५० च्या वरती लोकांना व्यसनमुक्त केले आहे व १५०० शाळा तंबाखू मुक्त केले आहे. राज मोहम्मद आपल्या संस्थाद्वारे ,रमजान, व दीपावली हे दोन मोठे सण कॅन्सर ग्रस्त परिवार ला रेशन किट देऊन साजरा करतात. कॅन्सर ग्रस्त परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. कॅन्सर ग्रस्त परिवारातील मुलींचं लग्नकार्यात साहित्य देऊन मदद करतात. त्यांचा पुढचा संकल्प कॅन्सर पेशनट सुधार केंद्र उघडायचा आहे.
कॅन्सर चा अवघड उपचारानंतर त्यांचं विश्रांती व मनोधैर्य वाढविण्यासाठी त्या केंद्रात रुग्णांना सर्व सुविधा पुरविले जाणार आहे. सर्वाना राज मोहम्मद आव्हान करतात. जीवन फार सुंदर व अनमोल आहे आपल्या परिवारासाठी राखीव ठेवा व्यसनाचा नांदी लागून आपले सुंदर आयुष्य उध्वस्त करु नका. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचे आहारी जाऊ नका. व्यसनमुक्त परिवार सुखी परिवार. आज जागतिक कॅन्सर दिना निमित्ताने या अमुल्य सामाजिक कार्यकरत्याला आरोग्यदूतला अल्लाहने अजून जीवनदान द्यावा हीच त्यांना या दिवसाचे शुभेच्छा.