चोपडा ते अकुलखेडा रस्त्यानेे अवैधरित्या गुरे वाहतूक ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा (विश्वास वाडे) चोपडा ते अकुलखेडा रस्त्यावर हॉटेल साईतृप्ती समोर अवैधरित्या गुरे वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, वाहन चालक संतोष प्रकाश चौधरी (वय ३१) रा. किसमत नगर शिरपूर याने चोपडा ते अकुलखेडा रस्त्यावर हॉटेल साईतृप्ती समोर त्याच्या ताब्यातील बदामी रंगाची अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ५३३१ सदर गाडीत गाडी मालक व गुरे मालक विजय लोटन पाटील रा. चोपडा यांच्या संमतीने सुमारे ९५००० रुपये किमतीचे दहा लहान-मोठे गोऱ्हे यांना दाटीवाटीने वाहनात भरून, त्यांना वेदना होतील अशा रीतीने जखडून, बांधून ,क्रूर वागणूक देऊन, कोंबून वाहतूक करताना अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ५३३१सह मिळून आला म्हणून पो. ना. सुभाष सपकाळ यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गु.र. नं.६३/ २०२२ प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ (क) ,(घ) ,(ड) मुंबई पोलीस ऍक्ट कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या अधिक तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. दीपक विसावे हे करीत आहेत.