महाराष्ट्रराजकीय

साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक : भाजपा उमेदवारांसाठी प्रचार प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरींचा व्यक्तीगत भेटीगाठींवर जोर

साक्री (प्रतिनिधी) साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक प्रभाग क्र.१ मधील भाजपा उमेदवार अॅड. पुनम शिंदे, प्रभाग क्र २ मधील उमेदवार स्वप्नील भावसार, प्रभाग क्र.९ मधील उमेदवार पंकज हिरे, प्रभाग क्र. १६ मधील उमेदवार योगेश चौधरी, प्रभाग क्र १३ मधील उमेदवाल शैलेश आजगे यांच्या प्रचारार्थ दि.१८ डिसेंबर रोजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधुन प्रचार केला. तसेच भाजपा उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहान केले.

शिवाय पक्ष कार्यालयात पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेवून उमेदवारांचा प्रचारसाठी जिद्दीने, चिकाटीने व अहोरात्र मेहनत घेवुन निवडुन आणण्याचे आवाहान केले. यावेळी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, अरुण धोबी, भाऊसाहेब देसले, साक्री तालुकाध्यक्ष वेडु सोनवणे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, पिंपळनेर अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, माजी जि. प. सदस्या सौ. लिलाबाई सुर्यवंशी, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी देवरे, विभाग संयोजक भाजपा सहकार आघाडी योगेश भामरे, धर्मराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरि, पंढरीनाथ महाले आदि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे