भाविकांना व्यापारी वर्गाला पाण्याची समस्या टंचाई भासू नये ; मुख्य अभियंताकडे मागणी
बोरसर (अशोक पवार) टाकळी मध्यम प्रकल्पाचे मुख्य अभियंता गोडसे यांच्या कार्यालयात जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप आवारे, भीमराव पाटील आवारे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्याबरोबर लासूरची ज्येष्ठ नेते भाजपाचे रवी देशमुख, सुदाम वंजारी, अभय देशमुख, ज्ञानेश्वर पवार, कृष्णा साबळे इत्यादी मान्यवरांनी मुख्य अभियंता यांच्याकडे मागणी केली.

थोड्या दिवसात लासुर श्री देवी दाक्षायणी माता यात्रा लासुर येथे दि 21 एप्रिल 2023 रोजी सुरू होत आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो संख्येने भाविक येतात. भाविकांना पिण्यासाठी पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रकल्पातून पाणी सोडावे जेणेकरून येणाऱ्या भाविकांना व्यापारी वर्गाला पाण्याची समस्या टंचाई भासू नये. त्यामुळे त्वरित शिवना नदीला पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली व कार्यकर्ते गावातील नागरिक उपस्थित होते.



