चोपडा
विठ्ठला सद्बुद्धी दे या सरकारला आमच्या मागण्या पूर्ण होऊ दे….। संपचा आज नाऊवा दिवस….
चोपडा आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी घातले विठ्ठरायाला साकडे
चोपडा : एसटी कर्मचाऱ्यांचे एस टी चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून राज्यव्यापी संप सुरू आहे या संपात चोपडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांसोबत राज्य सरकार बैठकांवर बैठका घेऊन कुठलाही निर्णय घेत नसल्याने आज कार्तिकी एकादशी निमित्त चोपडा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी विठ्ठलाचे प्रतिमेचे व एस टी चे पूजन करून त्यांचा पुढे साकडे घातलं सरकारला सद्बुद्धी येवो आशा घोषणा देत राज्य सरकारच्या विरोधात निषेध केला व एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होवोत अशी अपेक्षा संपकरी कर्मचाऱ्यांनी विठ्ठला पुढे साकडे घालून व्यक्त केली.