शिंदखेडा येथे भाजपा कार्यालयात तालुका भाजपाच्या वतीने भाजपा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भाजपा कार्यालयात देशभरात भाजपा स्थापना दिवस साजरा होत असताना शिंदखेडा तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्तेच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी स्थापना दिवस माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सपन्न झाला.
सुरुवातीला वीर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन जि. प. उपाध्यक्ष कुसुमताई कामरान निकम यांनी केले. त्यानंतर ध्वजारोहण करून तालुक्यातील व शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नागरिक दयाराम माळी ,आनंदा जिभाऊ माळी यासह माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.तसेच भगवा चौक ते शिवाजी चौफुलीपर्यत पदयात्रा काढण्यात आली. हयावेळी भाजपाचे नेते कामरान निकम , तालुकाध्यक्ष प्रा.आर.जी.खैरणार महिला तालुकाध्यक्षा माधुरी सिसोदे, जिल्हा सरचिटणीस डी.एस गिरासे ,जि.प.सदस्य डी.आर.पाटील, विरेंद्र सिंग गिरासे, पंकज कदम पंचायत समिती सभापती राजेश पाटील, उपसभापती राकेश पवार, पं.स.सदस्य प्रकाश बोरसे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, शहराध्यक्ष प्रविण माळी, रेल्वे आघाडी तालुकाध्यक्ष दादा मराठे नगरसेवक प्रकाश देसले , जितेंद्र जाधव , अॅड.विनोद पाटील, किसन सकट, सुभाष माळी, युवराज माळी ,कृउबा संचालक वाल्मिक बागुल, शिंदखेडा विधानसभा विस्तारक रामकृष्ण मोरे, कुलदीप अडराडे ,के.पी गिरासे, डोंगर बागुल (सरपंच मांडळ) ज्ञानेश्वर पवार, दिनेश पवार, रवींद्र गिरासे ,नरेश पवार, अर्जुन सोनवणे, राकेश महिरे ,कुणाल देसले , अतुल बोरसे, रवी माळी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तर सन -1980 पासून भाजपाची स्थापना होऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करीत सपुर्ण देशात मोठे वलय निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वात काम करीत असताना उत्साह वाढतो. अनेक लोकोपयोगी विकास कामांचा सपाटा जनता अनुभवते आहे. असे भाजपाचे कामराज निकम यांनी यावेळी सांगितले.