शिंदखेडा तालुक्यात वालखेडा शिवारातील शेतकऱ्याचे नुकसान, अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : प्रकाश पाटील
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील वालखेडा शिवार येथे किशोर भिला पाटील रा. वाघोदे यांच्ये शेत शिवार आहे. गट नंबर 441ड यांचे शेतात मका पिक घेतले आहे. सदर पाटचारी ला पाणी सोडण्यात आल्याने पाटचारी फुटुन यांच्या शेतात सर्व पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. तरी संबंधित अधिकारींना वारंवार सांगुन देखील लक्ष देत नाही. या वर्षातच जवळपास दहा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे वारंवार पाटबंधारे आॅफिस ला फोटो व बातमी देत राहतात तरी सुद्धा अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
शेतकरी कसाबसा कोरोणा महामारीत कंबरडे मोडले आहे. त्यातुन सावरत असताना तसेच अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आदी कारणांमुळे शेतकरी आधीच त्रस्त झाले आहेत. त्यांची दयामाया न येता पाठबंधारे विभागाचे अधिकारी मात्र शेतकऱ्याची पिळवणूक करण्यात टपला आहे. पाटचारीचे अव्वांच्या सव्वा किंमत लावून शेतकरी बांधवाकडुन दरवर्षी वसुल केला जातो. तरीही संबंधित विभागाकडून पाटचारीची सुधारणा होत नाही म्हणुन संत्तप्त शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर पाठबंधारे विभागाविरोधात जन आंदोलन करू व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा प्रकाश पाटील (संचालक डि.डि.सी.बॅंक व सरपंच डोंगरगाव) व वालखेडा शिवारातील असंख्य शेतकरी बांधवांनी इशारा दिला आहे .याकडे वरीष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा.आणि शिरजोर अधिकारी यांनी शेतकऱ्याची लावलेली चेष्टा थांबवावी.