महाराष्ट्रराजकीय

शरद पवार मोदींना भेटले !

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात पवार यांनी मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटे चर्चा झाली. नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.

शरद पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यात काही महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पवारांची भेट महत्वाची मानली जात आहे.

शरद पवार हे दिल्लीत आहेत. आज भाजपचाही स्थापना दिवस आहे. त्यामुळे मोदी सकाळी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. दुपारी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार काल दिल्लीत आले होते. अभ्यास वर्गासाठी हे आमदार दिल्लीत आले होते. महाराष्ट्रातील आमदार, खासदारांसाठी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम होता. रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था होती. याप्रसंगी भाजपचे नेते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी संजय राऊत यांच्याकडे माईक येताच भाजपच्या आमदारांनी काढता पाय घेतला होता.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे