शिवसेनेच्या आंदोलनला यश ; परिवहन विभाग अधिकाऱ्यांना शिवसेनेचा दणका
धुळे : रिक्षाचालक, खाजगी वाहन धारक यांच्या वर बेकायदेशीर दंडात्मक कारवाई करून महाराष्ट्र राज्य शासन व परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना बदनाम करू पाहणारे धुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ङाॅ.स्टीव्हन अलवारीस, परिवहन अधीकारी कदम यांच्या विरोधात शिवसेनेने उपजिल्हाप्रमुख किरणतात्या जोंधळे, महानगर प्रमुख मनोज मोरे, जिल्हा समन्वयक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज परिवहन कार्यालयात जोरदार आंदोलन केले.
दोन दिवसापूर्वी शहरातील 200 रिक्षा परिवहन कार्यालयाने उचलुन जमा करून त्यातील काही रिक्षा स्क्रॅब करून भंगार मालात कोणताही लेखी आदेश न काढता परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आणुन कारवाई साठी आलेल्या 100 रिक्षा तात्काळ सोडुन पुढील वर्ष भर नोटीस दिल्या शिवाय कारवाई करू नये असे आदेश परिवहन अधीकारी यांच्या कङुन लिहुन घेतले व शासनाचा कुठलाही आदेश नसतांना परिवहन मंत्री व परिवहन विभाग यांना बदनाम करणाऱ्या अधीकारी कदम याला निलंबित करून त्याची अन्यत्र बदली करण्याची मागणी केली, व या सर्दंभात उपप्रादेशिक परिवहन विभाग धुळे येथील कार्यालयात चालणाऱ्या गैरप्रकारा विषयी अनिल परब, मंत्री परिवहन विभाग यांच्या कङे रीतसर कारवाई साठी तक्रार सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहरातील रिक्षाचालकांसह शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.