न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेला जिल्ह्यातील उत्कृष्ठ शाळा पुरस्कार
जामनेर : विध्यार्थ्यांनी विविध कलेत पारंगत होऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे यासाठी सतत नवनविन उपक्रम शाळेत राबवले जातात व विद्यार्थ्यांवर कळत नकळत संस्कार केले जातात . असे संस्कार अनेक शाळांमध्ये केले जातात त्यापैकी एक म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल जामनेर ही शाळा होय .यासाठी लोकमततर्फे न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेला एक्सलंट टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात शाळेत अडचणी असताना माझ्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविले त्यांना संस्काराचे धडे गिरविले विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले हे सर्व तुमच्या शिवाय शक्य नव्हते या सन्मानात तुम्हा सर्वांचा वाटा आहे अशा शब्दात शाळेच्या मुख्याध्यापिका नरवाडे यांनी शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे पर्यवेक्षक व्ही डी पाटील, एम पी सावखेडकर, आर आर भोई तसेच ए बी चौधरी यांनी सर्व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले आहे.