शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सी बी देसले विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
शिंदखेडा (यादवराव सावंत) माध्यमिक शालांत परीक्षा एसएससी 2022 चा निकाल लागला असुन भडणे विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. परीक्षेत एकूण 27 विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 15 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह तर 9 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास होऊन शाळेचा एकूण 88.88 % निकाल लागला असून त्यात बागुल हितल युवराज हिने 88% मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.
भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळीयांची कन्या आहेतसेच गिरासे दिव्या अशोकसिंग 86.60% द्वितीय तर गोसावी प्रियंका योगेश 86% मिळवून तृतीय आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष साहेबराव जी पाटील सचिव प्रकाश जी पाटील व शालेय समिती अध्यक्ष भबुतराव जी देसले व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक , पी एस पवार,डी जी पाटील ज्येष्ठ शिक्षक ए पी देसले, वेंदे, सारंग पाटील, मनोहर पाटील, अहिरे, जीवन, शिंदे, निलेश, शरद पवार सूर्यवंशी बाई आदींनी अभिनंदन केले.