महाराष्ट्र
महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चा च्या वतीने धुळे जिल्हा अधीक्षकांची घेतली भेट !
धुळे : महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चा च्या वतीने रा.उ.शुल्क धुळे जिल्हा अधिक्षक मनोज शेवरे यांची भेट घेतली. तसेच जिल्हातील ग्रामीण भागातील वाढत्या अवैध दारूविक्री संदर्भात विस्तृत चर्चा करून मनोज शेवरे यांना कारवाई करण्यासंदर्भात महीलांच्या तक्रारीवरून गावांची लिस्ट दिली.
या संदर्भात शेवरे यांनी दारूबंदी महिला/युवा मोर्चा च्या दारूबंदी च्या कार्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्याचे सांगून वेळोवेळी धडक कारवाईं करण्याचे सांगितले आहे. धुळे जिल्हा पो.अधिक्षक प्रवीणकुमार पाटील व रा.उ.शु. मनोज शेवरे, धुळे जिल्हा यांच्या सारखे आपल्या जिल्हाला पुनः डँशीग व कतृत्ववान अधिकारी लाभले आहे. याचा आम्हा समस्त धुळेकरांना अभिमान आहे.