लिहाखेडी सेवा सहकारी सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार संपन्न
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना प्रणित दक्षिणमुखी मारुती महाराज सहकार विकास पॅनेलने बाजी मारली. त्यानंतर चेअरमन पदी शिवसेनेचे अशोक काशीराम साखळे तर व्हाईस चेअरमन पदी कृष्णा हरिभाऊ बावसकर यांची निवड झाली.
आज गुरुवार (दि.8) रोजी शहरातील सेना भवन येथे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नगरसेवक शंकरराव खांडवे , ग्रा.प.सदस्य रुपेश जैस्वाल , नवनिर्वाचित चेअरमन अशोक साखळे, व्हाईस चेअरमन कृष्णा बावस्कर, संचालक बाळाराम पा. साखळे, ज्ञानेश्वर सपकाळ, दत्तू पा. साखळे, अर्जुन बावस्कर, किरण मनगटे, समाधान फरकाडे, बाळाराम पांडुरंग साखळे, रामदास बावस्कर, भगवान साखळे आदींची उपस्थिती होती.