महाराष्ट्र
पवारांच्या निवासस्थानी झालेला हल्याच्या निषेधार्थ मोहोळ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा
सोलापूर : येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज मोहोळ तहसील कार्यालयावर आमदार यशवंत (तात्या) माने यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, सोलापूर जिल्हा दुध संघाचे व्हा.चेअरमन दीपक माळी, महिला अध्यक्षा सिंधुताई वाघमारे, वैजीनाथ धेडे महासचिव युवक काँग्रेस पार्टी जिल्हा सोलापूर सह जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सर्व नगरसेवक सह राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देवून दोषीवर कडक करावी अशी मागणी करून निषेध व्यक्त केला.




