४१ गावांसाठी ५ कोटी मंजूर : आमदार कुणाल पाटील
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास साधला जावा, गावातील समस्या दूर व्हाव्या यासाठी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून धुळे तालुक्यातील ४१ गावांसाठी ५ कोटी मंजूर झाले आहे. हा निधी २५: १५ लेखाशीर्षांतर्गत मंजूर केले आहे. धुळे तालुक्यातील प्रत्येक गावांतील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने आमदार कुणाल पाटील यांचे प्रयत्न सुरू आहे.
प्रत्येक गावात विकासाची कामे विविध योजनांतून टप्प्याटप्याने केली जात आहे. त्यानुसार आता ४१ गावांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. हा निधी मंजूर व्हावा यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला. या निधीतून चौगाव-हिंगणे, बाभुळवाडी, अंबोडे, तरवाडे, बिलाडी, दह्याणे, मेहेरगाव, वणी, कुटूंबा, बेंद्रेपाडा, न्याहळोद, मुकटी, सावळी तांडा, बुरझड, फागणे, निमखेडी, निकुंभे, धमाणे, मोहाडी प्र डा, गोताणे, बांबुर्ले, सातरणे, उभंड, लोणखेडी, लोहगड, नावरा, सौंदाणे, अजंग कासविहीर, भिरडाई, धामणगाव, आर्णी, वडणे, हडसुणे, सरवड, चिंचखेडे, अंचाडे, बल्हाणे, हेंद्रुण, विसरणे, गरताड, नवे भदाणे आदी गावात विकास कामे होणार आहे. त्यात सभागृहाचे बांधकाम, संरक्षक भिंत, रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे आदी कामे होतील.